झिम्बॉब्वेमध्ये लष्करामार्फत सत्तापालट झाल्यानंतर अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे 25 बेडरुम आणि 44 एकर परिसरात तयार झालेल्या आलिशान ब्ल्यू हाऊसमध्ये नजरकैद आहे. मुगाबेपेक्षा 41 वर्षे लहान असलेली ग्रेस तिच्या लक्झरियस लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. ग्रेसच्या डायमंड स्कँडलबद्दल विकीलीक्सने खुलासा केला होता की, या हिऱ्यातून आलेली रक्कम तिने कपडे, शूज आणि लाईफस्टाईलसाठी खर्च केले होते.
तिची टीम चोरट्या मार्गाने हिरे ग्रेसपर्यंत पोचवायची. या डायमंडच्या माध्यमातून तिने खूप पैसे जमवून आलिशान आयुष्य जगण्यासाठी खर्च केले ग्रेसवर आरोप आहे की, या रकमेतून तिने दोन ते तीन वर्षात 3000 स्टायलिश शूज खरेदी केले. त्यासोबत महागडे कपडेही खरेदी केल्याचा आरोप आहे.ग्रेसचा पॅरीस टूर चर्चेत राहिला. पॅरीसमध्ये तिने एक दिवसाच्या शॉपिंगवर तब्बल 64 लाख रुपये खर्च केले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews